

BMC Election
ESakal
विनोद राऊत
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात राजकीय स्पर्धा तीव्र झाली आहे. पक्षांची संख्या वाढल्याने उमेदवारांची संख्याही वाढणे अपेक्षित आहे; मात्र नगर परिषद, महापालिका निवडणुकीत उमेदवार बिनविरोध विजयी होण्याचे प्रमाण वाढत आहे. लोकशाहीसाठी हा प्रकार घातक असून, मतदारांना निवडणूक प्रक्रियेतून वगळले जात असल्याबाबत राजकीय विश्लेषकांनी चिंता व्यक्त केली आहे.