महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित राज ठाकरेंवर मोठी जबाबदारी; काय ठरतंय, वाचा

सुमित बागुल
Wednesday, 13 January 2021

आता मनसेनेही मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु केलीये.

मुंबई : मुंबईत महानगर पालिका निवडणुकांच्या तयारीला सर्वच पक्ष लागलेत. मुंबई महापालिकेचं आर्थिक बजेट म्हणजे जवळजवळ काही राज्यांच्या बजेट एवढं आहे. अशात मुंबई महानगर पालिका आपल्या पक्षाकडे राहावी यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मेहनत घेण्यास सुरवात केली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असल्याने आतापासून मुंबईतील वातावरण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तापायला लागलंय.

शिवसेना, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष या आधीच कामाला लागलेत. अशात आता मनसेनेही मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु केलीये. या मोर्चेबांधणीत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अमित ठाकरे यांच्यावर मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबाबतची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यावर चर्चा झाल्याचं समजतंय. 

हेही वाचा- ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCBकडून समन्स

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीत राज ठाकरेंसह महाराष्ट्रभरातील महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी हजर होते. या बैठकीच्या माध्यमातून येत्या काळात निवडणुकांना सामोरं जाताना नेमकी काय रणनीती आखली पाहिजे. राज्यात सध्या राजकीय, सामाजिक परिस्थिती कशी आहे, याचाही आढावा घेण्यात आला. राज ठाकरे यांनी स्वतः राज्यातील विविध मनसे नेत्यांशी चर्चा केली. अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका तसेच राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकांसाठी जोमाने कामाला सुरवात करण्याचे आदेश दिल्याचं समजतंय. 

अमित ठाकरेंवर कोणती जबाबदारी ? 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महत्त्वाच्या बैठकीत प्रत्येक महानगर पालिका क्षेत्रासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांची समिती तयार करण्याचे ठरविले आहे. सोबतच प्रत्येक क्षेत्रासाठी एक सरचिटणीस यांचीही नेमणूक करण्यात येईल. या सर्व समित्यांना सांभाळण्याचं काम हे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे यांच्याकडे असणार आहे अशी माहिती आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

municipal corporation election MNS to give major responsibility to amit raj thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal corporation election MNS to give major responsibility to amit raj thackeray