

Public Holiday On Polling Day
ESakal
मुंबई : मुंबईसह राज्यभरात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजेल आहे. येत्या १५ जानेवारी रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. पालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.