

Municipal Elections Highlight Growing Influence Of Dynastic Politics
Esakal
राज्यात २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांकडून यादी जाहीर न करता शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देण्यात आले. ज्यांना उमेदवारी नाकारली गेली त्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी राडाही झाला. भाजपच्या निष्ठावंतांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला. नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याच्या सूचना भाजपनं दिल्या होत्या. तरीही काही ठिकाणी आमदार, खासदारांच्या कुटुंबात तिकीट देण्यात आलंय.