Mumbai Belasis Bridge Opened
ESakal
मुंबई
Belasis Bridge: मुंबईकरांना दिलासा! 130 वर्षे जुना पूल वाहतुकीसाठी खुला; वेळेआधीच काम पूर्ण!
Mumbai News: मुंबईतील बेलासिस उड्डाणपुलाचे काम महापालिकेने वेळेआधीच पूर्ण केले असून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई : दक्षिण मुंबईतील ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या ‘बेलासिस’ उड्डाणपुलाचे काम महापालिकेने विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, निविदेतील मुदतीपेक्षा चार महिने आधीच म्हणजेच अवघ्या १५ महिने सहा दिवसांत या पुलाचे काम फत्ते करण्यात पालिकेला यश आले आहे.

