

Permission for new 4 kabbutrakhana
ESakal
मुंबई : ‘ज्या कबुतरखान्यांसाठी परवानगीचा अंतरिम निर्णय महापालिकेने घेतला अशा ठिकाणच्या कबुतरांना नियंत्रितरीत्या दाणे टाकण्यास परवानगी असेल, त्यानुसार फक्त सकाळी सात ते नऊ या दोन तासांच्या कालावधीतच कबुतरांना दाणे पुरवता येतील. या कबुतरखान्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे आल्या तरच ही परवानगी देण्यात येईल,’ असे निर्देश पालिकेने शुक्रवारी (ता. ३१) दिले.