
मुंबई : शहरात अतिवृष्टीमुळे दाणादाण उडाली असताना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा तिसरा डोळा अख्ख्या मुंबईवर नजर रोखून होता. कुठे पाणी भरले आहे, दरड कोसळली, झाड पडले किंवा कुठे वाहतूक कोंडी आहे, याचे इत्थंभूत चित्रण दहा हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत क्षणाक्षणाला केले जात होते. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा तत्काळ नागरिकांच्या मदतीला धावून जाणे शक्य झाल्याने मोठ्या प्रमाणावर जीवितहानी टाळता आल्याचे दिसून आले.