
मुंबई : शहरातील दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सुमारे ३,०४० दुकानदारांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दुकाने व आस्थापनांवर मराठी पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानांवर पाट्या लावण्यास दुर्लक्ष करणाऱ्या दुकानांवर महापालिकेकडून तपासणी करून कारवाई केली जाते.