

BMC Initiative on Gudi Padwa
ESakal
मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईकरांना घरगुती चवीच्या पुरणपोळ्या उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. पालिकेद्वारे अर्थसहाय्यित महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘पुरणपोळी महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले असून, मुंबईकरांना आता ऑनलाइन मागणीनुसार घरपोच स्वादिष्ट पुरणपोळ्या मिळणार आहेत.