esakal | पेंग्विनच्या देखभालीचा फेरविचार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पेंग्विनच्या देखभालीचा फेरविचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राणीच्या बागेतील पेंग्विनच्या (Penguins) देखभालीसाठी तीन वर्षात होणाऱ्या 15 कोटीच्या खर्चाबाबत महानगर पालिका (Municipal Corporation) फेरविचार करणार आहे.या कंत्राटात समाविष्ठ असलेली काही कामे महानगर पालिकेकडून (Municipal Corporation) केली जाऊ शकतात का याचा अंदाज घेऊन सुधारीत निवीदा मागविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

भायखळा येथील विरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्राणिसंग्रहालयातील सहा पेंग्विनच्या देखभालीसाठी महानगर पालिकेने निवीदा मागवल्या होत्या.तीन वर्षांच्या या कंत्राटात 15 कोटी रुपयां पर्यंतचा खर्च होण्याचा अंदाज होता.या खर्चावर कॉंग्रेससह भाजपनेही आक्षेप घेतला होता.कोविड काळात हा खर्च योग्य नाही.ही सर्व करण्यासाठी पालिकेकडे तज्ञ उपलब्ध आहेत.मग,निवीदा का मागवल्या जातात असा प्रश्‍न कॉंग्रेसने उपस्थीत केला होता.गेली दोन ते तीन दिवस या निवीदा प्रक्रियेवरुन वाद सुरु आहेत.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज या निवीदांचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतला. या निवीदेत समाविष्ठ असलेली काही कामे पालिकेतील तज्ञ,कर्मचारी स्वत: करु शकतात का याचा अभ्यास करण्यात येणार आहे.त्यानंतर सुधारीत निवीदा प्रसिध्द करण्यात येतील असा दावा करण्यात येत आहे.

हेही वाचा: पुणेकरांनो, उद्याने खूली झाल्याने, कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात जायचा विचार करताय का?

या निवीदा 15 कोटी रुपयांच्या नसून 11 कोटी 46 लाख रुपयांच्या या निवीदा होत्या.असा दावा आयुक्तांनी केला आहे.तसेच प्राणीसंग्रहालयात पेंग्विन आल्या पासून 2017 ते 2020 या काळात 12 कोटी 26 लाख रुपयांचे अतिरीक्त उत्पन्न मिळाले आहे.या काळात प्राणीसंग्रहालयाच्या तिकीट दरातून 14 कोटी 36 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.तर,2015 ते 2017 या काळात प्राणीसंग्रहालयाच्या तीकीट दरातून पालिकेला फक्त 2 कोटी 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.असा दावाही आयुक्त चहल यांनी केला.

loading image
go to top