पुणेकरांनो, उद्याने खूली झाल्याने, कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात जायचा विचार करताय का?

अशोक गव्हाणे
Tuesday, 1 December 2020

शहरातील पर्यटक उद्याने खुली झाल्याच्या गैरसमजातून प्राणीसंग्रहालयाला भेट देण्यासाठी येत आहेत. सुटीच्या दिवशीतर गेटसमोर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र पर्यटकांची निराशा होत आहे. ​

कात्रज (ता. ०१) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. तेव्हापासून कात्रजचे स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालय बंद आहे. मात्र, १ नोव्हेंबरपासून पालिकेकडून शहरातील काही उद्याने खुली करण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्राणीसंग्रहालय कधी चालू होणार असा प्रश्न पर्यटकांकडून केला जात आहे.

शहरातील पर्यटक उद्याने खुली झाल्याच्या गैरसमजातून प्राणीसंग्रहालयाला भेट देण्यासाठी येत आहेत. सुटीच्या दिवशीतर गेटसमोर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र पर्यटकांची निराशा होत आहे. खास करून बच्चे कंपनीचे मुख्य आकर्षण असलेले हे प्राणी संग्रहालय पाहता न आल्याने लहानग्यांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंदिरे, हॉटेल, उद्याने खुली झाली आहेत. मात्र प्राणीसंग्रहालयाला परवानगी देण्यात आलेली नाही. परंतु, उद्याने ज्या प्रमाणे खुली करण्यात आली त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम पाळून प्राणीसंग्रहालयही खुले करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा/

''मंदिरे, हॉटेल, उद्याने उघडली आहेत त्याच प्रकारे पर्यटकांना कोरोनाच्या नियमांतर्गत मास्क व सॅनिटायझरचा वापर करत सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुन 50% पर्यटकांनाच संग्रहालयामध्ये सोडण्यात यावे आणि प्राणीसंग्रहालय चालू करायला हवे.'' 
- राजाराम वीर, नागरिक भारती विद्यापीठ

''देशात आणि राज्यात आणखी कोणत्याही प्राणीसंग्रहालयाला खुले करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत प्राणीसंग्रहालय खुली करण्यात येणार नाहीत. तसेच कोरोनाचा प्रादर्भाव पुन्हा वाढल्याने प्राणीसंग्राहलय खुली केल्यास धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी उद्याने खुली झाली आहेत असे समजून प्राणीसंग्रालयासमोर गर्दी करु नये.''
- डॉ. राजकुमार जाधव, संचालक, स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालय
 

आळंदीमध्ये 10 दिवस संचारबंदी? राज्य शासनाला पाठविला प्रस्ताव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune residents do you plan to visit the Katraj Zoo