

Mumbai BMC Election Duplicate Voters
ESakal
मुंबई : मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या छाननीत अखेर एक लाख ६८ हजार ३५० मतदार प्रत्यक्षात दुबार असल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त यादीनुसार सुरुवातीला ११ लाख एक हजार ५०७ दुबार मतदारांची नोंद होती; मात्र मुंबई महापालिकेने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत केलेल्या सखोल तपासणीतून दुबार मतदारांची नावे पडताळली.