

Mumbai Melody Road
ESakal
मुंबई : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पावरील ‘संगीतमय मार्ग’ (मेलडी रोड) कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याच्या चर्चांना महापालिका प्रशासनाने पूर्णविराम दिला आहे. हा मार्ग बंद केलेला नसून, स्थानिक रहिवाशांच्या सुविधेसाठी केवळ रात्री या ५०० मीटरच्या पट्ट्यात बॅरिकेडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.