
मुंबई : दादरमधील ऐतिहासिक कबुतरखाना हटवण्यासाठी कारवाई करणाऱ्या पालिकेच्या पथकाला स्थानिकांच्या विरोधामुळे माघारी फिरावे लागले. स्थानिक नागरिकांनी गोंधळ घातल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फौजफाटा मागविण्यात आला. तरीही पालिकेच्या पथकाला माघार घ्यावी लागली.