
Patients Scheme
ESakal
मुंबई : मुंबईतील पालिका रुग्णालयांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मात्र, हीच परिस्थिती बदलण्यासाठी मुंबई महानगरपालिका योजना आखत आहे. रुग्णांच्या समस्या कमी व्हाव्यात यावर प्रशासन भर देत असून महानगरपालिकेने सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांना औषध, बेड आणि चाचण्यांसह सर्व सुविधा एकाच क्लिकवर देण्याचे आश्वासन दिले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपआयुक्त शरद उघडे यांनी यांसदर्भात पालिकेच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.