esakal | गणेशोत्सव साजरा करून परतणाऱ्यांवर पालिकेची नजर
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

गणेशोत्सव साजरा करून परतणाऱ्यांवर पालिकेची नजर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईवर (Mumbai) तिसऱ्या लाटेचा विळखा तयार होत आहे. गेल्या एका आठवड्यात ज्या प्रकारे नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे हे लक्षात घेऊन महापालिका (Municipal) आता अलर्ट मोडवर आहे. यावेळेस महानगरपालिकेने गणेशोत्सव (Ganesh Festival) साजरा करुन मुंबईला परतणाऱ्या लोकांची स्क्रीनिंग आणि कोरोना चाचणी करण्याचे नियोजन केले आहे.

महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या सर्वात आवडत्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून अनेक लोक कोकणात त्यांच्या गावी जातात. सध्या कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. रत्नागिरीचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 3.29 टक्के आणि सिंधुदुर्गचा 3.18 टक्के आहे. याशिवाय डेल्टा प्लसचे रुग्णही कोकणात सापडले आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महानगरपालिकेने कोकणातून येणाऱ्या लोकांची रेल्वे स्टेशन, एसटी बस स्टँड आणि मुंबईच्या एंट्री पॉईंटवर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कोरोनाची वाढते रुग्ण पाहता आम्ही कोकणातून परतणाऱ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. जर आम्हाला स्क्रीनिंगमध्ये कोरोना संशयित आढळला तर त्याची आरटीपीसीआर चाचणी लगेच केली जाईल. एवढेच नाही तर त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीचीही चौकशी केली जाईल. कोरोना पुन्हा पसरू नये म्हणून यासाठी हे पाऊल उचलत आहोत.

हेही वाचा: गणेशोत्सवात कोरोना टेस्ट करून घ्या; पोलिसांचं मंडळांना आवाहन

नजीकच्या संपर्कासाठी पहिल्या व पाचव्या दिवशी चाचणी -

कोरोना त्वरित ओळखण्यासाठी महानगरपालिकेने आपल्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. पूर्वी कोरोना संक्रमित संपर्कात आला तर पाचव्या दिवशी जवळच्या संपर्काची चाचणी केली जायची, परंतु आता पहिल्या दिवशी आणि पाचव्या दिवशी चाचणी केली जाईल. यामुळे, व्यक्ती संसर्गित आहे की नाही हे लगेच कळेल आणि जर अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्वरित उपचार केले जातील.

इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांची तपासणी -

कोकण व्यतिरिक्त, राज्यातील इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या लोकांच्या रेल्वे स्थानकांवर थर्मल स्क्रीनिंग आणि ऑक्सिजन पातळी तपासणी केली जाईल. जर कोणाला कोरोनाची लक्षणे दिसली तर त्यांची त्वरित चाचणी लगेच केली जाईल. लोकांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन आहे. गणेशोत्सवानंतर चाचण्यांची संख्या आणखी वाढेल. आम्ही आधीच बाजार आणि इतर सार्वजनिक ठिकाणी चाचणी शिबिरे सुरु केली आहेत.

डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका

loading image
go to top