esakal | गणेशोत्सवात कोरोना टेस्ट करून घ्या; पोलिसांचं मंडळांना आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

satara

गणेशोत्सवात कोरोना टेस्ट करून घ्या; पोलिसांचं मंडळांना आवाहन

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कोविडच्या (Covid) पार्श्वभुमीवरील गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांनी कोरोना (Corona) टेस्ट करून घ्याव्यात. उत्सव काळातच युवकांनी कर्तव्य दक्षता पाळून राज्य व देशात कऱ्हाडचा (Karhad) लौकीक उज्ज्वल करावा, असे आवाहन अप्पर पोलिस (Police) अधीक्षक धीरज पाटील (Dheeraj Patil) यांनी येथे केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर येथे आयोजीत शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलिस उपाधिक्षक रणजीत पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलीमा येडगे, पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील, पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, साथरोग कायद्यान्वये सरकारने नियमावली व निर्बंध आह्त. सातारा जिल्हा तिसर्‍या स्तरात असल्याने गणेशोत्सवात सूट अथवा परवानगी मागू नये कोरोनाची शासनाची नियमावली व निर्बंधाचे पालन करून प्रशासनाला सहतार्य करावे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी आपले वेगळेपण जपून आदर्श निर्माण करावा. गणेश उत्सव साजरा करताना कोरोना नियमांचे पालन पाळून विधायक कार्यात सहभागासह गरजूना मदत कार्यात, समाजसेवेत सहभाग घ्यावा.

पोलिस निरिक्षक पाटील म्हणाले, कोरोनाचा प्रसार अद्याप ही कमी झाला नसल्याने गतवर्षा प्रमाणाचे या ही वर्षी गणेशोत्सव साजरा करावा लागणार असल्यामुळे कोरोना नियमावलीचे व निर्बंधाचे पालन करूनच आपणाला गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. मुख्याधिकारी डाके म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा मंडप अथवा डेकोरेशन करू नये. गणेशाचे आगमन व विसर्जन पालिका याही वर्षा जबाबदारीने पार पडण्यास सज्ज आहे. पालिकेने याही वेशी कृत्रिम 21 तलाव केले आहेत.

हेही वाचा: कोरोनाचे निर्बंध पाळत गणेशोत्सव साजरा करा; पोलिसांचं मंडळांना आवाहन

दोन शेततळी आहेत. तर चौदा वाॅर्डात चौदा मुर्ती संकलन वाहन असणार आहेत. त्यासाठी पालिकेचे 300 कर्मचारी व वाहने तयार आहेत. कऱ्हाडला सार्वजनिक 234 तर घरगुतू 29 हजार मुर्तींचे विसर्जन वेगवेगळ्या दिवशी आहे. त्याचे नियोजन केले आहे.

हेही वाचा: कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर झोपून महिलांचे आंदोलन;व्हिडिओ

यावेळी जिल्हाधिकारी शिंदे यांच्यासह नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, हणमंत पवार, फारूक पटवेकर, मजहर कागदी, दादा शिंगण, मोहन कदम यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. रत्नाकर शानभाग यांनी सुत्रसंचालन केले. पोलिस उपाधीक्षक पाटील यांनी आभार मानले.

loading image
go to top