पालिकेचा अहवाल पुढील आठवड्यात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

मुंबई - दोन वर्षांपासून रखडलेला महापालिकेच्या हद्दीतील 274 पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल पुढील आठवड्यात सादर केला जाईल, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. 

मुंबई - दोन वर्षांपासून रखडलेला महापालिकेच्या हद्दीतील 274 पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल पुढील आठवड्यात सादर केला जाईल, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. 

अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच जुन्या पुलांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शुक्रवारपासून रेल्वेच्या हद्दीतील पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिटचे काम सुरू झाले आहे; मात्र पालिकेच्या हद्दीतील 274 जुन्या पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट होऊनही अहवाल रखडला आहे. त्यामुळे या पुलांच्या दुरुस्ती-पुनर्बांधणीचे काम लांबणीवर पडले आहे. अंधेरी दुर्घटनेनंतर पालिकेला जाग आली असून, हा अहवाल येत्या आठवडाभरात सादर करण्यासाठी पालिकेच्या पूल विभागाची धावपळ सुरू आहे. 

पालिकेच्या अखत्यारितील 274 पुलांपैकी काही जुने, ब्रिटिशकालीन आहेत. या पुलांची दुरुस्ती, पुनर्बांधणी करण्यासाठी स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय पालिकेने 2016 मध्ये घेतला. त्यानुसार सर्वेक्षण करून स्ट्रक्‍चरल ऑडिटचे कामही सुरू केले. त्याचा अहवाल सहा महिन्यांत सादर केला जाणार होता. स्ट्रक्‍चरल ऑडिटसाठी शहर, पूर्व व पश्‍चिम उपनगरांत तीन सल्लागार कंपन्या नियुक्त करण्यात आल्या. किती पूल जुने आहेत, आतापर्यंत किती वेळा डागडुजी झाली, पुलाचे आयुर्मान आदी तपासणी करण्यात आली. यातील ब्रिटिशकालीन पूल किती याची माहिती पालिकेला झाली. 

ऑडिट कशासाठी? 
महापालिकेने तपासणीच्या पहिल्या टप्प्यात सर्व पुलांचा आढावा घेतला. कोणता पूल पाडणे आवश्‍यक आहे, किती पुलांची दुरुस्ती करावी लागणार आहे व कोणता नवीन पूल बांधावा लागणार आहे, हे ठरवण्यासाठी स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Web Title: Municipal Corporation's Structural Audit report next week

टॅग्स