

Uddhav Thackeray
esakal
मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी ‘मातोश्री’वर इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला. ‘रात्र वैऱ्याची आहे, आपण सर्वांनी सजग राहायला हवे,’ अशा शब्दांत सावधानतेचा इशारा देऊन ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.