Municipal Election Polling Training Session
ESakal
मुंबई
Municipal Election Voting: मतदान प्रशिक्षण सत्रास उपस्थित राहण्याची अंतिम संधी, अन्यथा शिस्तभंगात्मक कारवाई अटळ
Polling Training Session: महानगरपालिका निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी अधिकारी आणि कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र या प्रशिक्षणास गैरहजर राहणा-यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवार, (ता.१५) रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी - कर्मचा-यांचे मतदान प्रक्रियेविषयीचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक होते.

