

Mumbai BMC Election
ESakal
मुंबई : मुंबईत दुरंगी लढती रंगणार असून शिवसेना ठाकरे गट आणि महायुती थेट भिडणार आहेत. शहर आणि उपनगरांत २४ दुरंगी लढती लक्षवेधी ठरणार आहेत. माजी महापौर मिलिंद वैद्य आणि माजी महापौर विशाखा राऊत या जागा शिवसेना ठाकरे गटासाठी महत्त्वाच्या आहेत. या उमेदवारांसमाेर महायुतीनेही ताेडीस ताेड उमेदवार दिले आहेत. प्रभाग क्र. १८२मधून माजी महापौर मिलिंद वैद्य यांना शिवसेना ठाकरे पक्षातून पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे राजन पारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.