AC लोकल ट्रेनचा तिकीट दर कमी होईना; मुंबईकर संतापले

रेल्वे मंत्रालय पालिका निवडणुकीत वाट बघत असल्याचा प्रवाशांचा आरोप
Mumbai AC Local Trains
Mumbai AC Local Trains Representative Image

मुंबई : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी एसी लोकलचे भाडे कमी करण्यावर विचारविनिमय सुरू असल्याचे मागील महिन्यात एका कार्यक्रमात सांगितले होते. मात्र, अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे एसी लोकलचे (Mumbai AC Local Trains) भाडे कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालय (Railway Ministry) पालिका निवडणुकीची वाट बघत आहे का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.

Mumbai AC Local Trains
खाऊचे पैसे न मिळाल्याने रागाच्या भरात सोडले घर

उपनगरीय रेल्वे मार्गावर थंडगार प्रवास सुरु व्हावा, यासाठी एसी लोकल सुरू आहे. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांना न परवडणारे तिकीट दर असल्याने एसी लोकल रिकामी जाते. तिकीट दर कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. मात्र, या मागणीला रेल्वे मंत्रालयाकडून (Railway Ministry) सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. फेब्रुवारी महिन्यात ठाणे-दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी एसी लोकलचे भाडे कमी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते.

Mumbai AC Local Trains
भाईंदर : अवघ्या महिन्याभरात उत्तन कचराभूमीला दुसर्‍यांदा आग

मागील महिन्यापासून मध्य रेल्वेवर नॉन एसी लोकलच्या फेऱ्या रद्द करून त्याजागी 34 एसी लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या आहे. या एसी लोकलचे तिकिट काढणे प्रवाशांना परवडणारे नाही. त्यामुळे एसी लोकलचे तिकिट दर कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. मात्र, तिकीट दर कमी केले जात नसल्याने रिकाम्या एसी लोकल धावत असल्याचे पाहून प्रवाशांना प्रचंड चीड येत आहे.

एसी लोकलचे भाडे कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालय मुंबई महानगर पालिका निवडणुकीचा मुहूर्त साधणार का? असा प्रश्न उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी उपस्थित केला आहे. राज्यकर्त्यांनी प्रवाशांची फसवणूक थांबविण्याचे विनंतीही केंद्र सरकारला केली आहे.आता आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असे देशमुख म्हणाले.

महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी महासंघटनेचे अध्यक्षा वंदना सोनवणे यांनी सांगितले की, मार्च-एप्रिल महिन्यात पालिका निवडणूक होण्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी एसी लोकलचे भाडे कमी करण्याबाबत विचाराधीन असल्याचे सांगितले. या गोष्टीला एक महिना झाला तरी अद्याप भाडे कमी करण्यावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे पालिका निवडणुक बघूनच निर्णय घेण्यात येईल, असे वाटतंय.

एसी लोकलचे तिकीट दर सर्वसामान्य मुंबईकरांना परवडतील, असे करायला पाहिजे. यातून प्रवाशांचा एसी लोकलला प्रतिसाद वाढेल. जर, एसी लोकलचे भाडे कमी केलेच नाही तर, एसी लोकल कशाला हव्यात. फलाटावर गर्दी असते, मात्र, एसी लोकल रिकामी धावते. त्यामुळे पुढील दोन लोकल फेऱ्यांना प्रचंड गर्दी होते, असे जनता दल सेक्युलरच्या मुंबई महासचिव ज्योती बडेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com