आयुक्त नसल्यामुळे लगाम सुटले! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नवी मुंबई - महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी हे निवडणुकांच्या कामासाठी तेलंगणा राज्यात कर्तव्यात असल्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत पालिका कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेशिस्त वर्तणुकीस सुरुवात केली आहे. सकाळी दहाला कार्यालयात हजर राहण्याची वेळ असतानाही पुन्हा काही कर्मचाऱ्यांनी उशिरा येण्यास सुरुवात केली आहे. दुपारी जेवणाची सुट्टी संपल्यानंतरही काही कर्मचारी पालिकेच्या तळघरात व वरच्या मजल्यावर शतपावली करताना दिसतात. त्यामुळे विविध कर भरण्यासाठी आणि काही कामांकरिता पालिकेत येणाऱ्या नागरिकांना तासन्‌ तास कर्मचाऱ्यांची वाट बघत बसावे लागत आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

शांत स्वभावाचे म्हणून परिचित असलेल्या आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी काही दिवसांपूर्वीच लेटलतीफांवर कारवाई करून त्यांना चांगलाच धडा शिकवला होता; तर वर्षानुवर्षे एकाच खात्यात खुर्ची उबवून हितसंबंध जोपासणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विभागनिहाय बदल्या करून त्यांना दणका दिला. रामास्वामी यांच्या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. तसेच कर्मचाऱ्यांना शिस्त लागल्याने कामांसाठी आलेल्या नागरिकांना कर्मचारी जागेवर उपलब्ध होत असत; मात्र गेल्या महिनाभरापासून रामास्वामी हे निवडणुकीकरिता परराज्यात असल्याने त्यांच्या गैरहजेरीत पालिकेतील कर्मचाऱ्यांना रान मोकळे झाले आहे. अनेक जण दुपारी जेवणासाठी एक वाजण्याआधीच भोजनालयात येत असतात. तसेच जेवणाची वेळ दुपारी दोन वाजता संपल्यानंतरही कोणी पुन्हा आपल्या जागेवर जाऊन पुन्हा कामाला सुरुवात करताना दिसत नाही. त्याऐवजी काही महिला कर्मचारी घोळक्‍यात पालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर गप्पा मारताना दिसतात; तर काही महिला कर्मचारी तळघरातील वाहने उभी करण्याच्या जागेत शतपावली करताना दिसतात. त्यामुळे पालिकेत कर व विविध देयके भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासन्‌ तास कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसावे लागते. 

मी घणसोलीहून सोसायटीतील वृक्षतोडीसाठी तडजोड शुल्क भरायला आलो आहे; मात्र जेवणाची वेळ संपून अर्धा तास झाला तरी रोखपाल आला नसल्याने ताटकळत उभे राहावे लागले आहे. 
- अनिल पाटील, नागरिक 

संबंधित कर्मचाऱ्यांच्या विभागप्रमुखांना कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच जे कर्मचारी पुन्हा उशिराने येत असतील, त्यांची बायोमेट्रिकवर हजेरी तपासून कारवाई करण्यात येईल. 
- किरण यादव, उपायुक्त, प्रशासन विभाग 

Web Title: municipal employee has started unconscious behavior in the absence of the Commissioner