पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा लांबणीवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

बायोमेट्रिक यंत्रणेतील त्रुटीमुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे लांबलेले वेतन आता बुधवारी होण्याची शक्‍यता आहे. सोमवारी वेतन मिळण्याची शक्‍यता फोल ठरली आहे. वेतन न झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा सुमारे ६० हजार असल्याचा दावा संघटनांनी केला आहे.

मुंबई - बायोमेट्रिक यंत्रणेतील त्रुटीमुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे लांबलेले वेतन आता बुधवारी होण्याची शक्‍यता आहे. सोमवारी वेतन मिळण्याची शक्‍यता फोल ठरली आहे. वेतन न झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा सुमारे ६० हजार असल्याचा दावा संघटनांनी केला आहे.

कर्मचाऱ्यांचा हजेरी पट बंद करून महापालिकेने बायोमेट्रिक हजेरी सुरू केली आहे. त्याला कामगारांच्या संघटना विरोध करत असतानाच तांत्रिक दोषामुळे एप्रिल महिन्याचे वेतन मिळालेले नाही. असे सुमारे ६० ते ७० हजार कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नसल्याचा दावा कामगार संघटना करत आहेत. त्यातील ११ हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी परिपत्रक प्रसिद्ध करून १३ मे रोजी वेतन होईल, असे आश्‍वासन दिले होते. पालिकेच्या कार्यपद्धतीनुसार दर महिन्याच्या १३ तारखेला प्रत्येक कर्मचाऱ्याच्या रजा आणि साप्ताहिक सुट्ट्यांच्या यंत्रणेत अपडेट होतात. त्यामुळे सोमवारी कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत होते. मात्र, त्यांची निराशा झाली. आता बुधवारी (ता. १५) वेतन होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Municipal employee wages again postponed