esakal | संतापजनक ! स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी मागितले पैसे
sakal

बोलून बातमी शोधा

antyasanskar

गुरूवारी (ता. 28) संध्याकाळी रुक्मिणी जिजाराम चव्हाण (वय 59) यांचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मालवणी स्मशानभूमीत नेले होते.

संतापजनक ! स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी मागितले पैसे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मालाड : मालवणी येथील स्मशान भूमीतील पालिका कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कारावेळी मृताच्या नातेवाईकांना पैसे मागितल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर संतप्त नातेवाईकांनी कारवाईची मागणी केली आहे. गुरूवारी (ता. 28) संध्याकाळी रुक्मिणी जिजाराम चव्हाण (वय 59) यांचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मालवणी स्मशानभूमीत नेले होते. मात्र स्मशानभूमीतील पालिका कर्मचाऱ्यांनी अंत्यविधी झाल्यानंतर मृत महिलेचे नातेवाईक गणेश क्षीरसागर यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. यावेळी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी, "इथे मृत व्यक्तीचे शव व्यवस्थित जळणार नाही" अशी धमकी दिल्याचेही गणेश क्षीरसागर यांनी सांगितले.

नक्की वाचा : कोरोना वॉर्डातून मिळाला डिशचार्ज, घरी आलेत आणि अवघ्या चार तासात....

ही बाब मनपा अधिकारी पंडित यांना सांगितली असता, त्यांनीही "स्वखुशीने पैसे द्या" असे उत्तर दिले. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका गीता भंडारी यांना दूरध्वनीवरून घड़लेल्या प्रकारची माहिती दिल्यानंतर व त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कारवाईचे आश्वासन दिले.

सर्वात मोठी बातमी - कोरोना रुग्णांना उपचार देण्याबाबत झाला 'मोठा' निर्णय...

पण मनाला भेडसावत असेलला प्रश्न अनुत्तरित आहे!
घरात कोणाचा मृत्यू झाला असेल तर अशा परिस्थितीत महानगरपालिका कर्मचाऱ्यांना खुषीने पैसे द्यावे का? तरी आपणांस विनंती आहे की, कृपया मेलेल्या माणसांच्या टाळूवरील लोणी खाण्याऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षा द्यावी.
- गणेश क्षीरसागर, नातेवाईक

सदर प्रकार गंभीर आहे. त्याची माहिती घेऊन त्यामधील दोषींवर त्वरीत योग्य ती कारवाई केली जाईल.
- संजोग कबरे, सहायक पालिका आयुक्त, पी उत्तर विभाग

Municipal employees demanded money during the funeral at the cemetery