

Employees Retirement Age
ESakal
वाशी : महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव मंगळवारी (ता. ११) नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता दोन वर्षे पालिकेची अधिक काळ सेवा करता येणार आहे. स्थायी समितीने मंजुरी केलेला हा विषय मंजुरीसाठी प्रशासन सरकारकडे मंजुरीसाठी पाठवणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.