
मुंबई महानगर पालिकेचा कॅग अहवाल विधानसभेत सादर झाला. या अहवालात पालिकेच्या कारभारावर मारले ओढले आहेत. त्याबाबत पालिका प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.
Mumbai News : लोकलेखा समितीसमोर सर्व आरोपांना उत्तर देणार; पालिका प्रशासन
मुंबई - मुंबई महानगर पालिकेचा कॅग अहवाल विधानसभेत सादर झाला. या अहवालात पालिकेच्या कारभारावर मारले ओढले आहेत. त्याबाबत पालिका प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. या अहवालातील सर्व आरोपाबाबत लोकलेखा समितीपुढे उत्तर दिले जाणार असल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने दिले आहे.
विधानसभेत सादर झालेला कॅगचा अहवाल प्रारूप आहे. हा अहवाल अंतिम नाही. कॅगने केलेल्या आरोपांबाबत आम्ही लोकलेखा समितीपुढे जावून सर्व आरोपांना उत्तरे देणार आहोत. आमचे म्हणणे समिती ऐकून घेणार आहे. त्याचा ड्राफ्ट तयार होणार आहे. समिती याबाबतची प्रश्नावली तयार करणार आहे. त्या प्रश्नांना आम्ही उत्तरे देणार आहोत. प्रशासन आपली बाजू समितीसमोर मांडणार असल्याची माहिती पालिका प्रशानाने दिली.
कॅगचे ऑडिट नऊ विभागांचे आहे. १२ हजार कोटींच्या कामांचे हे ऑडिट आहे. निविदा न काढता काही कामे देण्यात आल्याचा ठपका आहे. पारदर्शकतेचा अभाव, ढिसाळ नियोजन आणि निधीचा निष्काळजीपणा असे निरीक्षण कॅगने अहवालात नोंदवले आहे.या सर्व आरोपांना पालिका प्रशासन लोकलेखा समितीला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.