Mumbai News: पुनर्विकासाचा खर्च १८० कोटींवर, सफाई कामगारांच्या वसाहतींसाठी २१.९० कोटींची वाढीव तरतूद

Sanitation Workers Colony Redevlopmnet: मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या तीन वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा खर्च पुन्हा वाढला आहे. यासाठी १८० कोटी ६१ लाख रुपयांचा सुधारित खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.
BMC

BMC

Esakal

Updated on: 

मुंबई : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांच्या तीन वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या खर्चात पुन्हा वाढ करण्यात येणार आहे. जे. पी. नगर (गोरेगाव), आकुर्ली रोड (कांदिवली पश्चिम) आणि बाभई नाका (बोरिवली पश्चिम) येथील वसाहतींच्या पुनर्विकासासाठी आता एकूण १८० कोटी ६१ लाख रुपयांचा सुधारित खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.

Loading content, please wait...