
धारावी : महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या मोटर लोडर विभागाचे खाजगीकरण करण्याचे धोरण राबविण्याचे ठरविले आहे. या धोरणाला म्युनिसिपल मजदूर संघासहित मनपा कामगार संघटना संघर्ष समितीने तीव्र विरोध केला असून आज सोमवार ता. २३ रोजी परिमंडळ १ च्या उपायुक्त संगीता हसनाळे यांना भेटून हे खाजगीकरणाचे टेंडर तात्काळ रद्द करावे या संदर्भात निवेदन दिले.