पालिका वाहनांच्या बॅटऱ्यांची चोरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कोपरी मलनिस्सारण विभागाच्या दोन जेटिंग मशीन वाहनांच्या चार बॅटऱ्या चोरट्यांनी लांबविल्याची घटना 23 ते 24 ऑगस्टदरम्यान घडली. त्यांची किंमत 20 हजार रुपये असून याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठाणे महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या नौपाडा आणि उथळसर प्रभाग क्षेत्रातील ड्रेनेज सफाईचे कंत्राट मे. ओम इंडस्ट्री इंजिनियरिंग सर्विसेस यांच्याकडे आहे. त्यांच्याकडील दोन ड्रेनेज जेटिंग वाहने कोपरी येथील कन्हैयानगरमधील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रात उभ्या केलेल्या असतात. या वाहनांचे चालक सोनू मेडवाज आणि अनिल ढकोलिया यांनी 23 ऑगस्टला सायंकाळी आपल्या ताब्यातील वाहने नेहमीप्रमाणे पार्क केली होती.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे दोन्ही चालक कामावर आले असता दोन्ही वाहनांमधील प्रत्येकी दोन अशा चार बटऱ्या गायब असल्याचे आढळले. मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रात सुरक्षारक्षक असतानाही हा प्रकार घडला आहे. 

Web Title: Municipal Vehicle Battery Theft