
Byculla Zoo
ESakal
मुंबई : भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणी बाग) विस्ताराची महापालिकेची योजना रखडली आहे. साधारण सहा एकर जमिनीवर विस्तार करण्याचा हा प्रस्ताव आहे. यापैकी चार एकर जमीन महापालिकेच्या ताब्यात आहे; मात्र उर्वरित दोन एकर भूखंड खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या ताब्यात आहे. या मोबदल्यात या व्यावसायिकाने तब्बल ६०० कोटी रुपयांची मागणी केल्याने हा प्रकल्प रखडल्याचे चित्र आहे.