

Municipality action to prevent pollution in Diwali
ESakal
मुंबई : मुंबईत दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होते. सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी होते. त्यातच मोठ्या प्रमाणात मुंबईत बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे वातावरणात धूळ निर्माण होत आहे. त्याची प्रदूषणात भर पडते. तसेच हिवाळ्यात प्रदूषण आणि थंडी यामुळे आजारपण वाढण्याची शक्यता आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाशी समन्वय साधून पालिका उपायोजना करीत आहे. सुरक्षिततेचे नियम पाळत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.