पालिकेने केलं शुल्क माफ, मात्र पार्किंग ठेकेदारांकडून वाहन चालकांची पाकीटमारी सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेने केलं शुल्क माफ, मात्र पार्किंग ठेकेदारांकडून वाहन चालकांची पाकीटमारी सुरूच

वाहानतळाच्या कंत्राटदारांना लॉकडाऊनच्या काळात महानगर पालिकेने शुल्क माफ केले आहे .

पालिकेने केलं शुल्क माफ, मात्र पार्किंग ठेकेदारांकडून वाहन चालकांची पाकीटमारी सुरूच

मुंबई : वाहानतळाच्या कंत्राटदारांना लॉकडाऊनच्या काळात महानगर पालिकेने शुल्क माफ केले. मात्र, ठेकेदार वाहान मालकांकडून शुल्क वसुल करत आहेत. लॉकडाऊन काळात वाहानांचा वापर कमी झाल्याने ही वहाने काही महिने वाहानतळांमध्येच उभी होती. त्यांचे हजाराे शुल्क वाहान मालकांकडे मागितले जात असून अन्यथा वाहान जप्त केले जात असल्याचे प्रकार पुढे आले आहेत.

कोविड काळात महानगर पालिकेने विविध विभागांच्या कंत्राटदार आर्थिक सुट दिली. यात वाहानतळांची जबाबदारी सांभाळणाऱ्या कंत्राटदारांना 23 मार्च ते जुलै अखेरपर्यंतचे संपुर्ण शुल्क माफ करण्यात आले. तर, ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत 50 टक्के शुल्क माफ करण्यात आले आहे. मात्र, तरीही ठेकेदार वाहानतळांवर उभ्या असलेल्या वाहानांचे शुल्क वसुल करत आहे.

महत्त्वाची बातमी : अण्णासाहेब पाटील महामंडळाची जबाबदारी अजित पवार यांच्या नियोजन खात्याकडे वर्ग

वरळी येथे देवनारायण पाल यांना तब्बल 33 हजार 5 रुपये शुल्क भरण्याची पावती ठेकेदाराने दिली आहे. याबाबत पाल यांनी पालिकेच्या विभाग कार्यालयात तक्रारही केली. मात्र, प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शुल्क न भरल्यास गाडी न सोडण्याचा इशारा दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, अमित उपध्याय यांचा डंपर वरळी येथील दुसऱ्या वाहानतळावर उभा होता.

या सहा महिन्याच्या काळासाठी त्यांना 31 हजार 800 रुपयांचे शुल्क भरावे लागले आहे. शुल्क भरले नसले तरी डंपर सुटणार नव्हता. त्यामुळे नाईलाजाने हे शुल्क भरावे लागले असेही उपध्याय सांगतात.

महत्त्वाची बातमी : "खेळ तर आता सुरु झाला आहे उद्धव ठाकरे", जेलमधून बाहेर आल्यानंतर अर्णब यांची प्रतिक्रिया

कोविड काळात महापालिकेने कंत्राटदारांना विविध सुविधा दिल्या. काही कंत्राटदारांना नियमीत शुल्कात सुट दिली. तर,काहींना पालिकेकडे असलेली अनामत रक्कम काही प्रमाणात देण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाचा फायदा सामान्य नागरीकांना होण्याची अपेक्षा होती.मात्र,कंत्राटदारांनी स्वत:चा फायदा करुन सामान्य नागरीकांना ठेंगा दाखवत त्यांच्याकडून हजारो रुपये आकारत आहे.त्यावर महापालिकेकडूनही कोणतीही कारवाई केली जात नाही.

( संपादन - सुमित बागुल )

municipality waived the fees but the parking contractors continue to rob motorists

loading image
go to top