अण्णासाहेब पाटील महामंडळाची जबाबदारी अजित पवार यांच्या नियोजन खात्याकडे वर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णासाहेब पाटील महामंडळाची जबाबदारी अजित पवार यांच्या नियोजन खात्याकडे वर्ग

बहुचर्चित अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज राज्य सरकारने गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन खात्याकडे वर्ग केले आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळाची जबाबदारी अजित पवार यांच्या नियोजन खात्याकडे वर्ग

मुंबई, ता.12: बहुचर्चित अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज राज्य सरकारने गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन खात्याकडे वर्ग केले आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडे असलेले हे महामंडळ नियोजन खात्याकडे वर्ग करण्याचा निर्णय  सारथी संस्थेच्या आढावा बैठकीत जुलै महिन्यात घेण्यात आला होता. त्याबाबतचा शासन निर्णय आज काढण्यात आला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक आणि प्रशासकीय बाबींवर नियत्रंण ठेवण्याची जबाबदारी आता नियोजन विभागाकडे राहील. सोबतच महामंडळाशी संबंधित अर्थसंकल्पीय तरतूदी सुद्धा नियोजन विभागाकडे वितरित करण्यात येतील, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबई विमानतळावर क्रिकेटर कृणाल पांड्याला DRI ने घेतलं ताब्यात, चौकशी सुरु!

मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या या महामंडळाचे भागभांडवल 50 कोटींवरून 400 कोटी रुपये पर्यंत वाढवले आहे. मात्र, राज्य सरकारने भागभांडवल उपलब्ध करून न दिल्याने व सारथी संस्थेच्या बाबतीतही सरकार निर्णय घेत नसल्याने जून- जुलै महिन्यात मराठा समाजातील संघटना आक्रमक झाल्या होत्या. 

सारथी संस्था विजय वडेट्टीवार यांच्या बहुजन विकास कल्याण विभागातंर्गत कार्यरत होती. मात्र, मंत्री वडेट्टीवार हे ओबीसी असल्याने सारथीला न्याय देत नसल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला होता. जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सारथी संस्थेच्या आढावा बैठक झाली होती. सारथी संस्था आणि कौशल्य विकास विभागातंर्गत मोडत असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या दोन्ही संस्था  नियोजन विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. 

महत्त्वाची बातमी : "खेळ तर आता सुरु झाला आहे उद्धव ठाकरे", जेलमधून बाहेर आल्यानंतर अर्णब यांची प्रतिक्रिया

त्याचा शासन निर्णय गुरुवारी काढण्यात आला. 4 नोव्हेंबर रोजी एक आदेश काढत पूर्वीच्या भाजप सरकारने नेमलेले महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर आज हे महामंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती सोपवले गेले आहे.

(  संपादन - सुमित बागुल )

responsibility of Annasaheb Patil Mahamandal finally given to Ajit Pawar planning department

loading image
go to top