पालिका करणार टीबीमुक्त मुंबई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

मुंबई महापालिकेने मुंबई मिशन फॉर टीबी कंट्रोल योजना
आखली आहे

मुंबई : मुंबई महापालिकेने सन 2025 पर्यंत क्षयमुक्त भारत या भारत
सरकारच्या घोषणेच्या धर्तीवर मुंबई महापालिकेने मुंबई मिशन फॉर टीबी कंट्रोल योजना
आखली आहे, तसा कृती आराखडाही तयार केला आहे. या आराखड्याचे मुंबईचे महापौर
विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या हस्ते आज पालिका मुख्यालयातील महापौर दालनात प्रकाशन
झाले. 

सन 2013 मध्ये पालिकेने मुंबई मिशन फॉर टीबी कंट्रोल ही घोषणा केली होती. सन
2022 पर्यंत क्षयमुक्त भारत या भारत सरकारच्या घोषणेच्या धर्तीवर मुंबई
महापालिकेने2019-20 कृती आराखडा तयार करून क्षयमुक्त मुंबई योजना आखली.
हा आराखडा केंद्रीय क्षयरोग विभाग, राज्य क्षयरोग विभाग आणि इतर सहकारी यांच्या
सहकार्याने तयार करण्यात आला आहे.

या कृती योजनेमध्ये रोगप्रतिबंध आणि सर्वसुविधांचे बळकटीकरण करणे यावर भर दिली आहे. त्याचे प्रकाशन आज झाले. यावेळी सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष हर्षला मोरे, नगरसेवक राजू पेडणेकर तसेच अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त डॉ.अश्विनी जोशी, उप आयुक्‍त सुनिल धामणे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipality will make TB-free Mumbai