अंधेरीत पोलिस खबऱ्याची हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मुंबई - आंबोली दुहेरी हत्याकांडातील महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या पोलिस खबऱ्याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अविनाश सोळंखी ऊर्फ बाली (३८) असे त्याचे नाव आहे. एमआयडीसी परिसरातील गाळ्यात त्याचा मृतदेह आढळला. बालीच्या हत्येप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. बालीची प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय आहे.

बाली हा २००१ पासून पोलिसांचा खबरी म्हणून काम करायचा. फरारी आरोपीचा अंधेरी एमआयडीसीत गाळा आहे. सोमवारी पहाटे बालीचे काही मित्र त्या गाळ्याजवळ आले. गाळ्याच्या परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने बालीच्या मित्रांना संशय आला. यादरम्यान फरारी आरोपीच्या भावाने फोन केल्यामुळे पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी गाळ्याचे शटर उघडले असता बाली रक्ताच्या थारोळ्यात आढळला.

बालीच्या साक्षीमुळे चौघांना शिक्षा
२०११ मध्ये आंबोली येथे दुहेरी हत्याकांड झाले होते. किना सॅंटोस आणि रियुब फर्नांडिस या दोघांची हत्या झाली होती. या घटनेचा बाली साक्षीदार होता. बालीने शेवटपर्यंत साक्ष कायम ठेवली होती. त्यामुळे चारही आरोपींना न्यायालयाने अजन्म कारवासाची शिक्षा सुनावली होती.

Web Title: murder in andheri