हा तर लोकशाहीचा खून; युवक काँग्रेस आक्रमक

हा तर लोकशाहीचा खून; युवक काँग्रेस आक्रमक

मुंबई: रेनिसन्स हॉटेलमध्ये असलेल्या कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना भेटायला आलेले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा, संजय निरुपम काँग्रेस नेते नसीम खान आणि यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर महाराष्ट्र युवक काँग्रेस आक्रमक झाली असून भाजपकडून हा लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम चालू असल्याचे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

हॉटेलच्या बाहेर थांबलले असताना शिवकुमार, देवरा, निरुपम नसीम खान यांना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सध्या मुंबई विद्यापीठाच्या विश्रामगृहावर यांची सक्तीने रवानगी करण्यात आली आहे. यावर युवक काँग्रेस आक्रमक झाली असून युवक काँग्रेसचे पदाधिकारी सकाळपासून शिवकुमार यांच्यासोबत ठाण मांडून बसलेले आहेत. 
 


दरम्यान, कर्नाटकचे राजीनामानाट्य मुंबईत सुरु असताना मुंबई काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेश युवकचे नेते हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मुंबई काँग्रेसचे नेते आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हे सुरवातीपासून डी के शिवकु्मार यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com