पाच वर्षीय चिमुकलीची हत्या; महिलेला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

अंजलीचा शोध सुरू असताना गुजराथच्या नवसारी रेल्वे स्थानकातील महिलांच्या प्रसाधनगृहात अंजलीचा मृतदेह रविवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास आढळून आला.

मुंबई - नालासोपारा येथून अपहऱण कऱण्यात आलेल्या 5 वर्षाय अंजली सरोज या चिमुकलीचा मृतदेह गुजराथच्या नवसारी रेल्वे स्थानकातील प्रसाधनगृहात आढळून आला आहे. हत्येप्रकरणी तुलिंज पोलिसांनी अनिता वाघेला या महिलेला अटक केली.

नालासोपारा पुर्वेच्या विजय नगर येथील साई दर्पण सोसायटीत अंजली आई वडिलांसह राहते. शनिवारी संध्याकाळी ती इतर लहान मुलांसमवेत घराबाहेर खेळत होती. बराच वेळ झाला तरी ती न आल्याने तिच्या आईने शोधाशोध सुरू केली आणि नंतर तुळींज पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले असता एक अज्ञात महिला अंजलीला जबरदस्तीने घेऊन जात असताना आढळली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्वरीत विशेष पथके तयार केली

अंजलीचा शोध सुरू असताना गुजराथच्या नवसारी रेल्वे स्थानकातील महिलांच्या प्रसाधनगृहात अंजलीचा मृतदेह रविवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास आढळून आला. पोलिसांचे पथक नवसारी येथे रवाना झाले असून त्या स्थानकाचे सीसीटीव्ही तपासून संशयित महिलेचा शोध घेत आहेत. ही महिला अपहरणाच्या दिवशी काही वेळा त्या परिसरात घुटमळत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या वर्णावरून पोलिसांनी तिचे रेखाचित्र तयार केले. तांत्रिक माहितीवरुन अनिता वाघेलाला तुलिंज पोलिसांनी अटक केली. 

Web Title: The murder of a five-year-old girl in mumbai