शारीरिक सुखास नकार देणाऱ्या मित्राची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

मुंबई : साकीनाका येथे एका अल्पवयीन मुलाने त्याच्याच 10 वर्षांच्या मित्राची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याचे प्रकरण उजेडात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या मुलाने मित्रावर गुरुवारी लैंगिक अत्याचार करण्याचाही प्रयत्न केला असता, त्या वेळी आरडाओरडा केल्यामुळे त्याची हत्या केल्याचे सांगितले. याप्रकरणी मुलासह त्याच्या सहकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मित्र हरवल्याची बतावणी करीत त्याच्या कुटुंबीयांसह तोही मित्राला शोधण्यासाठी त्यांच्याबरोबर फिरत होता. 

साकीनाका परिसरातून 10 वर्षांचा मुलगा हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच्या शेजारी राहणाऱ्या 15 वर्षांच्या मुलाने त्याला खेळण्यासाठी सोबत नेले होते; मात्र रात्री उशिरापर्यंत तो परत आला नाही. त्याच्या वडिलांनी सर्वत्र शोधाशोध केली. त्यांच्यासह तो 15 वर्षांचा त्याचा मित्रही होता. त्यानंतर त्या मुलाच्या वडिलांना मध्यरात्रीच्या सुमारास एक निनावी फोन आला. तुमच्या मुलाचे आम्ही अपहरण केले आहे. तो जिवंत हवा असल्यास पाच लाख रुपये द्या, अशी मागणी फोनवरून करण्यात आली. पोलिसांनी या फोनचा माग काढला असता संपर्क होत नव्हता. 

मृतदेह बॅगेत भरून नाल्यात फेकला 

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवली. हरवलेला मुलगा त्याच्या मित्रासोबतच शेवटी दिसला होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. त्याने पोलिसांनाही तो हरवल्याची बतावणी केली; मात्र पोलिसांनी विश्‍वासात घेतल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.

संध्याकाळी मित्राला घेऊन तो सार्वजनिक शौचालयात गेला असता, त्या ठिकाणी त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने आरडाओरडा केल्यामुळे रागाच्या भरात त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह बॅगेत भरून साकीनाक्‍याच्या नाल्यात फेकल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: The murder of a friend who refuses physical relationship