
माथेरान : माथेरानमध्ये रेल्वे अधिकारी विश्रामगृहातील आऊट हाऊसमध्ये शुक्रवारी (ता.१४) सकाळी याठिकाणी काम करणारा सुशांत गजगे बेशुद्धावस्थेत आढळला. माथेरान पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल सोनोने यांच्यासह उपनिरीक्षक गणेश गिरी, राजेश रामदास, हवालदार अशोक राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.