29 वर्षीय मुलीच्या डोक्यात खलबत्ता घालून गळ्यावर चाकूनं वार; राजूला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

पोलिस तपासात राजूनंच खलबत्याच्या सहाय्यानं मनिषाला मारहाण केल्याचं समोर आलंय.

29 वर्षीय मुलीच्या डोक्यात खलबत्ता घालून गळ्यावर चाकूनं वार

मुंबईतील साकीनाका परिसरात 29 वर्षीय मुलीची डोक्यात खलबत्ता मारुन आणि गळ्यावर चाकूनं वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मनिषा जाधव (Manisha Jadhav) असं त्या मुलीचं नाव आहे. गुरूवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास साईबाबा मंदिराजवळ संघर्षनगर, चांदिवली येथे जखमी अवस्थेत मुलगी पडली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मनिषा हिला तातडीनं उपचारासाठी जवळील घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात (Ghatkopar Rajawadi Hospital) नेलं. मात्र, उपचारादरम्यान मनिषाचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी घोषित केलं. मनिषा ही मागील 3 वर्षापासून तिचा मित्र राजू निळे (वय 42) याच्यासोबत लिव्ह अॅण्ड रिलेशनशिपमध्ये (Live and Relationship) राहत होती. राजू पहिल्या पत्नीला भेटायला गेलाय, हे समजल्यानंतर मनिषा आणि राजू यांच्यात वाद झाला. त्याच वेळी रागातून राजूनं मनिषाला मारहाण केली.

हेही वाचा: High Court च्या आदेशानंतर भाजप खासदाराची तुरुंगातून सुटका

पोलिस तपासात राजूनंच खलबत्याच्या सहाय्यानं मनिषाला मारहाण केल्याचं समोर आलंय. राजू हा टिव्ही दुरूस्तीचं काम करत असून मनिषा ही घरकाम करत असल्याची माहित पोलिसांनी दिलीय. या प्रकरणी पोलिसांनी राजूला अटक केली असून साकीनाका पोलिस ठाण्यात (Sakinaka Police Station) गुन्हा दाखल केलाय.

हेही वाचा: विजेच्या धक्क्यानं 333 हत्तींचा मृत्यू; Supreme Court ची नोटीस

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsCrime News
loading image
go to top