esakal | १५ लाखांच्या खंडणीसाठी ठेकेदाराची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

१५ लाखांच्या खंडणीसाठी ठेकेदाराची हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातील (Thane) कोलशेत (Kolshet) येथील एका ४७ वर्षीय ठेकेदाराची मजुरांनीच १५ लाखांच्या (Lakh) खंडणीसाठी अपहरण (Kidnapping) करून हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कापुरबावडी (Kapurbawdi) पोलिसांनी (Police) दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर अन्य साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपींनी मृतदेहाची जमिनीत पुरून विल्हेवाट लावली.

हनुमंत शेळके (वय ४७) असे अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव असून ते रंगकामाचे कंत्राट घेत असायचे आहे. तर शिवा रामलाल वर्मा (वय २४) आणि सूरज श्रीराम वर्मा (वय २२) असी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांनी शेळके यांचे अपहरण करून १५ लाखांची खंडणी मागितली होती. कापुरबावडी पोलिसांनी शिताफीने तपास करून तांत्रिक माहितीच्या आधारे सापळा रचून शिवा रामलाल वर्मा याला जांभळी नाका येथून तर सूरज श्रीराम वर्मा याला कल्याण येथून ताब्यात घेतले. त्यांनी आणखी तीन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

हेही वाचा: युवासेना करणार वृक्षारोपण ; भारतीय प्रजातींची दहा हजार झाडे लावणार

शेळकेंकडील दहा हजार रुपये रोख व ५ ते ७ तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीमध्ये पुरला असल्याची कबुलीदेखील आरोपींनी दिली. दरम्यान, मृतदेह बाहेर काढून अंत्यविधीसाठी वारसांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.

loading image
go to top