ठाणे - चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या

मुरलीधर दळवी
बुधवार, 28 मार्च 2018

मुरबाड (ठाणे) : मुरबाड जवळील नांदेणी गावात बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शाळेत गेलेल्या एका शाळकरी मुलाची शाळे जवळच निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे तर नांदेणी व परिसरातील गावात शोककळा पसरली आहे.

सुरज ज्ञानेश्वर भोईर (वय 10) हा विद्यार्थी सकाळी शाळेत गेला होता. शाळेच्याच आवारात असलेल्या मोडक्या घरात तो लघुशंकेसाठी गेला असता त्याच घरात दबा धरुन बसलेल्या संशयित जयवंत भोईर याने धारधार कोयत्याने त्याच्या मानेवर व तोंडावर वार करुन तो पळुन गेला. त्याचा आवाज ऐकुन त्याच्या सोबत असलेल्या मित्राने शाळेतील शिक्षकांना सांगितले.

शाळेतील शिक्षक पाठारे व भोईर यांनी गावकऱ्याच्या मदतीने त्याला उपचारासाठी मुरबाड येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यु झाला असे पोलिसांनी सांगितले. जयवंत भोईर पळुन जाण्यात यशस्वी झाला तर त्याने नेमके का मारले  याचा शोध पोलीस घेत आहेत.

आईवडीलांना एकुलता एक असलेल्या सुरजची हत्या नेमक्या कुठल्या कारणाने झाली हा चर्चेचा विषय बनला असुन संशयित मारेकरी जयवंत हा त्याचा काका लागत असल्याचे समोर आले आहे. या घटनेची  माहीती मिळताच स्थानिक पोलिसांसह ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक महेश पाटील, गुन्हे अन्वेषण  पथक, डॉग स्कॉड, फॉरेेन्सिक स्कॉड घटना स्थळी दाखल झाले. 

ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, मुरबाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एस इ ए हश्मी तालुका गट  शिक्षणाधिकारी  मधुकर घोरड, मुरबाडचे नगराध्यक्ष मोहन सासे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: murdered boy in standard 4th in school