उल्हासनगरमध्ये 40 वर्षांनंतर मुस्लिम समाजाला मिळाले कब्रस्तान

दिनेश गोगी
शनिवार, 1 डिसेंबर 2018

उल्हासनगर : वारंवार उपोषण करून कब्रस्तानसाठी 40 वर्षांपासून लढा देणाऱ्या उल्हासनगरातील मुस्लिमांना आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी या सासू-सुनेने मिळवून दिलेल्या भूखंडामुळे कब्रस्तान मिळाले आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनाही भूखंडाचे श्रेय देण्यात येत आहे.

उल्हासनगर : वारंवार उपोषण करून कब्रस्तानसाठी 40 वर्षांपासून लढा देणाऱ्या उल्हासनगरातील मुस्लिमांना आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी या सासू-सुनेने मिळवून दिलेल्या भूखंडामुळे कब्रस्तान मिळाले आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनाही भूखंडाचे श्रेय देण्यात येत आहे.

उल्हासनगरात मुस्लिमांची संख्या सुमारे पाऊण लाखाच्या आसपास आहे. घरात कुणाची मयत झाली तर त्याचा जनाजा अंबरनाथ, कल्याणला दफन करण्यासाठी न्यावा लागत होता. काही महिन्यांपूर्वी जागा उपलब्ध नसल्याने कल्याण, अंबरनाथच्या दफनभूमी ट्रस्टने उल्हासनगरातील जनाजांना स्पष्ट नकार घंटा दाखवली होती. एकीकडे मुस्लिम पालिकेसमोर कब्रस्तानसाठी सतत उपोषण करत असताना दुसरीकडे आमदार ज्योती कलानी,डॉ.बालाजी किणीकर यांनी अधिवेशनात कब्रस्तानसाठी आवाज उठवत होते.

मुस्लिमांच्या कब्रस्तानसाठी प्रथम म्हारळच्या नजिकचा भूखंड, त्यानंतर कॅम्प नंबर 5 मधील भूखंड देण्यात आले होते. मात्र म्हारळचा भूखंड नव्या विकास आराखड्यात वगळण्यात आल्याने व कॅम्प 5 मधील भूखंडावर नागरी वसाहत असल्याने मुस्लिमांना कब्रस्तानकरिता भूखंड मिळणार की नाही हा संशोधनाचा विषय बनला होता. या दोन्ही भूखंडांपैकी एकही भूखंड मिळत नसल्याने मुस्लिम बांधव अहलेवतन मुस्लिम सामाजिक संघटनेच्या वतीने मैनुद्दीन शेख, अब्दुल गफार,बादशहा शेख,रियाज शेख यांनी पुन्हा उपोषण सुरू केले होते.

आमदार ज्योती कलानी,महापौर पंचम कलानी,युथ आयकॉन ओमी कलानी,नगरसेवक राजेश वधारिया यांनी आयडीआय कंपणीचा भूखंड,बोटक्लब,व्हिटीसी,इंदिरागांधी मार्केट या भूखंडाच्या मालकीहक्काची मागणी उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्याकडे केल्यावर गिरासे यांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे पाठवला होता.

नार्वेकर यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर गिरासे यांनी या भूखंडाचा सनदच्या रूपात मालकी हक्काची कागदपत्रे ज्योती कलानी,पंचम कलानी,ओमी कलानी,राजेश वधारिया यांच्याकडे सुपूर्द केली होती. तेव्हा तत्कालीन आयुक्त गणेश पाटील यांच्या कालावधीत आयडीआय कंपनीचा भूखंड कब्रस्तानसाठी देण्यात आला होता. मात्र, तत्पूर्वीच आयडीआय कंपनी प्रशासनाने कोकण विभाजित अप्पर आयुक्तांकडे धाव घेत मुस्लिम कब्रस्तानविरोधात स्टे मिळविला होता. त्याची सुनावणी पार पडली.

या सुनावणीत पालिका उपायुक्त संतोष देहेरकर यांनी आपली बाजू मजबुतीने ठेवल्याने तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती अप्पर आयुक्त हिरालाल सोनावणे यांना दिल्यावर त्यांनी हा स्टे उठवला. त्यामुळे कब्रस्तानचा मार्ग मोकळा झाल्यावर आज सायंकाळी महापौर पंचम कलानी,युथ आयकॉन ओमी कलानी,उपायुक्त मुख्यालय संतोष देहरकर,मालमत्ता व्यवस्थापक विशाखा सावंत आदींच्या उपस्थित मुस्लिमांना आयडीआय कंपनीचा भूखंड कब्रस्तानसाठी देण्यात आला. आयुक्त अच्युत हांगे यांनी कब्रस्तानच्या सभोवताली कूंपन घालण्याचे व सर्व सोयी पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Muslim Community Gets Cemetery after 40 years in Ulhasnagar