Mumbai: मुंबईत मराठी-हिंदी वाद संपेना! मराठी बोलू नको...; मुस्लिम तरुणाची अरेरावी, मराठी मुलाचा नकार अन् नंतर घडलं भयंकर कृत्य
Mumbai Marathi-Hindi Dispute: वाशीमध्ये एका मराठी तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. मुस्लिम तरुणाने मराठी बोलल्यामुळे त्याच्या मित्रांच्या मदतीने या मुलाला मारहाण केली.
महाराष्ट्रातील भाषेचा वाद काही संपत नाही आहे. मराठीचा वाद आता कॉलेजपर्यंत पोहोचला आहे. वाशी येथील एका कॉलेजबाहेर मराठीत बोलल्याबद्दल दुसऱ्या राज्यातील तरुणांनी एका मराठी विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.