esakal | गणराज विराजमान झाले 'कॅनव्हास फ्रेम' मखरात
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati festival

गणराज विराजमान झाले 'कॅनव्हास फ्रेम' मखरात

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : राज्य सरकारच्या (mva government) सूचनेनुसार यंदा साधेपणाने गणेशोत्सव (Ganpati Festival) साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार साधेपणामध्ये आकर्षक आणि इकोफ्रेंडली देखावा (Ecofriendly Decorations) तयार करण्यास गणेशभक्तांनी (Ganesha Devotees) भर दिला आहे. यासाठी कॅनव्हास फ्रेम मखर तयार केला जात आहे.

हेही वाचा: मुंबईत मलेरियाची रुग्णवाढ; घरातच सापडतोय डेंगींचा डास

कॅनव्हासवर गणेशमूर्तीला साजेसे चित्र काढून गणपतीला मखरात विराजमान केले आहे. चेंबूर येथील रहिवासी तेजस लोखंडे यांच्या गणपतीचा देखावा कॅनव्हास फ्रेममध्ये तयार केला आहे. त्यासाठी कॅनव्हास पेंटिंग आणि सिपोरेक्स या दगडातून आसन आणि खांब कोरून, त्यांना सुवर्ण रंग देऊन एकंदरीत सजावटीचे सौंदर्य वाढविले आहे. निसर्गातील निळ्या आकाशाचे आणि हिरव्या वनराईच्या रंगावर गोल सुवर्ण सूर्यामध्ये सोनेरी नक्षीकाम केले आहे. तसेच निसर्गातील लाल मातीचा लाल रंग हा आसनाखाली वापरला आहे. यासाठी संकल्पना, सजावट आणि प्रकाश योजना ही तेजस लोखंडे आणि प्रणव बामणे यांनी केली आहे.

मागील 60 हून अधिक वर्षांपासून गणपती घरात विराजमान होत आहेत. दरवर्षी नवनवीन देखावा तयार करण्यावर भर असतो. इकोफ्रेंडली गणेशोत्सव देखावा तयार करून निर्सगाशी एकरूप देखावा केला आहे. यामध्ये सजावटीचे एक मुख्य आकर्षण म्हणजे, बाप्पा विसर्जन झाल्यानंतर सुद्धा या साऱ्या सजावटीचे साहित्य वर्षभर सोबत ठेवता येते. कारण यामधले पेंटिंग व कोरीव काम केलेले आसन आणि खांब घरात भिंतीवर, कॉर्नर टेबल या ठिकाणी सजावटीसाठी वापरता येऊ शकतात, असे लोखंडे यांनी सांगितले.

कॅनव्हास फ्रेम तयार करण्यासाठी एकूण 6 ते 7 हजार रुपयांचा खर्च येतो. तर, इतर देखाव्याचा खर्च 4 ते 5 हजार येतो. त्यामुळे 10 ते 12 हजार खर्च येतो. पूर्वी अनेक गणेशभक्तांना कॅनव्हास फ्रेम तयार करू देत होतो. मात्र, कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक बाजू कमकुवत झाल्याने यंदा कॅनव्हास फ्रेम तयार करून दिली नाही, असे लोखंडे यांनी सांगितले.

loading image
go to top