esakal | मुंबई : मेट्रो 3 ची डिसेंबर-जानेवारीत चाचणी होणार | Metro railway
sakal

बोलून बातमी शोधा

metro rail

मुंबई : मेट्रो 3 ची डिसेंबर-जानेवारीत चाचणी होणार

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : राज्य सरकारने (mva Government) तात्पुरत्या स्वरूपात ट्रेनच्या चाचणी (metro test) करीता व ट्रेन पार्क करण्यासाठी सुविधा निर्माण करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 भुयारी मार्गावरील पहिली आठ डब्याची ट्रेन या वर्षाअखेरीस मुंबईत दाखल (metro in Mumbai) होणार आहे.  हे आठ डबे स्वतंत्रपणे मुंबईत आणले जातील व त्यांचे एकत्रीकरण केले जाईल.

हेही वाचा: Sakal Impact : महात्मा गांधी जयंती दिनी ठेवलेली प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली

या प्रकियेला किमान दोन आठवड्याचा कालावधी लागेल आणि त्यानंतर पहिल्या ट्रेनच्या चाचणीस सुरुवात होईल. हे आठ डबे स्वतंत्रपणे मुंबईत आणले जातील व त्यांचे एकत्रीकरण केले जाईल. या प्रकियेला किमान दोन आठवड्याचा कालावधी लागेल आणि त्यानंतर पहिल्या ट्रेनच्या चाचणीस सुरुवात होईल. त्यामुळे डिसेंबर-जानेवारीमध्ये मेट्रो 3 च्या चाचण्या होण्यास सुरुवात होईल.

मेट्रो 3 बाबत आतापर्यंत खूप राजकारण झाले असून मेट्रो 3 कशी असणार, त्याची चाचणी कधी होणार असे प्रश्न मुंबईकरांना पडले आहेत. तर, राज्य सरकारने ट्रेनच्या चाचणी करीता व ट्रेन पार्क करण्यासाठी सुविधा निर्माण केल्याने मेट्रो 3 ची चाचण्या भुयारी भागास आणि भुपुष्ठभागावर जोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रॅम्पच्या मुखाशी होणार आहे. सारिपुत नगर येथील रॅम्प 225 मी. लांब आहे, अशी माहिती मेट्रो 3 च्या प्रशासनाकडून देण्यात आली.

ट्रेनसाठी पर्यायी कारशेड कुठे असणार ?

- सध्या नमुना गाडीच्या चाचण्या होणार आहेत. ही ट्रेन मरोळ-मरोशी मार्गावर बांधण्यात येणाऱ्या तात्पुरत्या सुविधा जागेवरच पार्क करण्यात येईल.

तिसऱ्या ट्रेनची निर्मिती सुरू

एकूण आठ डब्याच्या 2 ट्रेन्स सध्या तयार असून तिसऱ्या ट्रेनची निर्मिती सुरू आहे.

loading image
go to top