काय तो पाऊस, काय ते खड्डे...; कल्याण डोंबिवलीतील तरुणाचा व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

My KDMC my pride youth protested administration by swimming in pit water
काय तो पाऊस, काय ते खड्डे...; कल्याण डोंबिवलीतील तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

काय तो पाऊस, काय ते खड्डे...; कल्याण डोंबिवलीतील तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

डोंबिवली - काय तो पाऊस काय ते खड्डे आणि किती तो टॅक्स....केडीएमसी ओके मध्ये...माझी केडीएमसी माझा अभिमान असे म्हणत एका तरुणाने कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांवरुन एक व्हिडीओ तयार केला आहे. चक्क खड्ड्यांत पोहोत त्याने प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे. हा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत असून खड्ड्यांवरुन नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांवरुन स्थानिक नागरिक वारंवार प्रशासनाला लक्ष करीत असताना देखील येथील परिस्थिती सुधारत नसल्याची प्रतिक्रीया नागरिक व्यक्त करीत आहेत.

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची पावसाळ्यात दुरावस्था झाली असून खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डे बुजविण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरु आहे, परंतू अद्यापही अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे जैसे थे आहेत. यावरुन आता शहरातील तरुणांनी समाज माध्यमावर मिम्स, कार्टून्सच्या माध्यमातून आवाज उठविला आहे. एका तरुणाने खड्ड्यात पोहण्याचा व्हिडीओ बनविला असून हा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे पाण्यात पोहोण्यास शिकलो आहे असे म्हणत हा तरुण चक्क गाळाच्या पाण्यात पोहला आहे. तसेच काय तो पाऊस, काय ते खड्डे आणि किती तो टॅक्स...केडीएमसी ओके मध्ये...माझी केडीएमसी माझा अभिमान असे म्हणत त्याने प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे. पालिका प्रशासन आता तरी या समस्येकडे गांर्भियाने लक्ष देणार का हे पहावे लागेल.

Web Title: My Kdmc My Pride Youth Protested Administration By Swimming In Pit Water

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..