मुंब्रा येथील मदरशात 'ते' बांग्लादेशी, मलेशियन काय करीत होते?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

  • मुंब्रयातील विदेशी नागरिकांचे गूढ कायम? 
  • आसरा देणे विश्वस्तांना भोवले;
  • निजामुद्दीनशी संबंध नसल्याचे पालिकेचे स्पष्टीकरण 

ठाणे : मुंब्रा मदरशातील 13 बांगलादेशी, आठ मलेशियन नागरिकांसह 25 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. या सर्वांची दिल्लीच्या निजामुद्दीन तबलिगी मेळाव्याशी संबधित असल्याच्या संशयाने तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्यांचा या सोहळ्याशी संबंध नसल्याचे ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले तरी ते भारतात कशासाठी आले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातद्वारे एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देश-विदेशातील सुमारे आठ हजार नागरिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यात सहभागी झालेल्यांचा सरकारकडून शोध घेतला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर काही बांगलादेशी हे मुंब्रा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एका मदरशामधून 13 बांगलादेशी व 8 मलेशियन नागरिकांसह एकुण 25 जणांना ताब्यात घेतले. त्यांची पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली असता, सर्वाचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. तसेच, या सर्व विदेशी नागरीकांचा निजामुद्दीन येथील मेळाव्याशी संबंध नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. मात्र, या विदेशी नागरिकांचा मरकजशी संबंध नसेल, तर ते भारतात कोणत्या हेतूने आले? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंब्रा येथे 13 बांगलादेशी, आठ मलेशियन नागरिकांसह 25 जणांना आसरा देणाऱ्या तन्वीर उल उल्लम मदरशामधील चौघे आणि नदि-उल-फलाह शाळेच्या चार विश्वस्तांविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे पासपोर्ट सुद्धा जप्त करण्यात आले आहे. 
- मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, मुंब्रा पोलिस ठाणे.

The mystery of foreign citizens of Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mystery of foreign citizens of Mumbai