बापरे! मुंबईत एन- 95 मास्कचा काळाबाजार; झेरॉक्स दुकानात जास्त किंमतीने मास्कची विक्री..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

एफडीएने साकीनाका येथील, बाबूजी झेरॉक्स, गजानन कृपा, असल्फा, घाटकोपर रोड, साकीनाका मुंबई येथे धाड घालून झडती घेतली. 

मुंबई :  मुंबई येथील साकीनाका विभागात एका  झेरॉक्स दुकानातून एन 95 मास्कचा साठा जास्त किंमत आकारून विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला  प्राप्त झाली होती. त्यानुसार एफडीएने साकीनाका येथील, बाबूजी झेरॉक्स, गजानन कृपा, असल्फा, घाटकोपर रोड, साकीनाका मुंबई येथे धाड घालून झडती घेतली. 

यामधून सुमारे 4 लाख 50 हजार रुपयांचा एन 95 मास्कचा साठा जीवनावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत जप्त करून दुकानाचे शिवजीभाई खेताभाई बरवाडिया  यांना अटक करण्यात आली आहे.  

हेही वाचा: अरे वाह! पालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरांना पुन्हा 'ताज' चे जेवण; 1 जुलैपासून होणार सुरुवात 

सोमवारी अन्न व औषध प्रशासनाकडून साकीनाका येथील, बाबूजी झेरॉक्स, गजानन कृपा, असल्फा, घाटकोपर रोड, साकीनाका मुंबई येथे धाड घालून झडती घेतली. यावेळी झेरॉक्स दुकानाचे मालक शिवजीभाई खेताभाई बरवाडिया यांच्या दुकानाच्या झडतीत मोठ्या प्रमाणात विविध उत्पादकाचे एन 95 मास्क आढळून आले आहेत. 

त्याचबरोबर या जागेत चार ते पाच झेराक्स मशीन , प्रिंटींग पेपर , लामिनेशन मशीन, संगणक देखील आढळून आले. सदर व्यक्ती बाबूजी झेरॉक्स  या दुकानातून याते ट्रेडर्स  (Yatee Traders ) या  नावाने एन 95 मास्क  चा खरेदी विक्रीचा  व्यवसाय करीत होते. यावेळी खरेदी विक्रीचे कागद पत्रे तपासले असता एन 95 मास्कची विनाबिलाने  मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याचे निदर्शानास येते. 

तसेच सदर व्यक्तीने उत्पादकाने  एन 95 मास्कचे दर निश्चित केले त्यापेक्षा जास्त दराने मास्कची विक्री केल्याचे आढळले. त्यामुळे औषध निरीक्षक, बृहन्मुंबई यांनी सविस्तर तपास अहवाल तयार करून पुढील चौकशी तपास कामासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  

हेही वाचा: काय सांगता! सोमवारी 'या' प्रकरणी मुंबईत एकही गुन्हा दाखल नाही; वाचा सविस्तर बातमी..

या जागेतून सुमारे 4 लाख 50 हजार रुपयांचा एन 95 मास्क चा साठा जीवनावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत जप्त केला असून दुकानाचे मालक शिवजीभाई खेताभाई बरवाडिया यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान कोठेही संशयास्पद सॅनिटायझर, औषधे अवैधपणे व अवाजवी दराने विक्री होत असल्याचे आढळल्यास प्रशासनाच्या  1800 222 365 या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा,असे आवाहन सह आयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांनी केले आहे.

N 95 mask  sold in double price in mumbai  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: N 95 mask sold in double price in mumbai